Surprise Me!

संसार सावरण्यासाठीची Diva रहिवाशांची धडपड | Water Logged In Diva | Thane

2021-09-13 0 Dailymotion

ठाणो - दिव्यातील पुर परिस्थिती आता हळू हळू नियंत्रणात येत आहे. परंतु या पुरामध्ये चाळी मधील अनेकांचे संसार उधवस्त केल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. या पुरात कोणाचे घरातील धान्य वाहनु गेले, तर कोणाचे शैक्षणिक साहित्य, पुरानंतर कोणाच्या घरात चोरी झाली तर अनेक जण आजही शासकीय मदती मिळण्याची आस लावून बसले आहे. तर कोणी आपल्या पाल्यांची पुस्तके सुकविण्यासाठी उन्ह पडण्याची वाट बघत आहे. दुसरीकडे पुर नियंत्रणात आल्यानंतर या भागात आता आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सगळीकडे दरुगधी, नाले भरलेले, पाण्यात किडे, चाळीच्या टाकींमध्ये पुराचे पाणी गेलेले, अशा अनेक समस्या दिव्यात दिसू लागल्या आहेत. परंतु त्यांच्या मदतीसाठी आजही फारसे कोणी फिरकले नसल्याचेच दुख: त्यांना सतावत आहे.<br /> काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने दिवा गावातील अनेक भाग पाण्याखाली गेले होते. पालिकेने शर्तीचे प्रयत्न करीत येथील 85क्क् रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले होते. त्यानंतर आता पुरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर अनेक चाळ धारकांनी घराची वाट धरली खरी. मात्र घरची परिस्थिती पाहून अनेकांचे अश्रु अनावर झाले आहे. कोणाच्या घरातील महत्वाचे सामान पुरात भिजले होते, तर कोणाचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले होते, तर काहींच्या घरातील उरल्या सुरल्या सामानावर चोरांना डल्ला मारला होता. आज इतके दिवस झाल्यानंतरही चाळधारकांना आजही मदत मिळालेली नाही, तर साधी औषधफवारणीसुध्दा झालेली नाही. नाल्यांमध्ये गाद्या, उशा, पुस्तके, फर्निचर आदी साहित्य पडून आहे. अनेकांचा संपूर्ण संसारच यात वाहून गेल्याने अनेकांना आपले दुख: अनावर होत आहे. दिव्यात हक्काचे घर मिळेल म्हणून अनेकांनी या चाळींमध्ये घरे घेतली होती. काहींचे तर दर महिना घराचा हप्तासुध्दा जात आहे. मात्र आता पुराने आमच्या या स्वप्नातील संसारावरच पाणी फेरल्याचे येथील रहिवाशी सांगतात. पाण्याच्या लाईन अस्तावस्त झाल्या आहेत. अतिशय गढुळ पाणी नळाला येत आहे, चाळींमध्ये पाण्याच्या टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. परंतु आता त्याच टाक्यांमध्ये पुराचे पाणी गेल्याने पिण्याचे पाणी मिळण्याचे हालही होत आहे. सर्वत्र दरुगधी पसरली असून साथीच्या आजारांनाही डोके वर काढले आहे. आता र्पयत विविध साथ ?

Buy Now on CodeCanyon